Vijay Wadettiwar | पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय – विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) नुकतेच अमेरिका दौऱ्यावर गेले होते. अमेरिका दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात गुंतवणूक करणाऱ्या कॉर्पोरेट्सना भेटले. याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात महाराष्ट्रातवर पुन्हा अन्याय झाल्याचं, विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Maharashtra has been wronged again during Prime Minister Modi’s visit to America – Vijay Wadettiwar

ट्विट करत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ट्विट करत विजय वडेट्टीवर म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय! पंतप्रधान मोदींनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात स्वाक्षरी केलेल्या सौद्यांमध्ये फक्त आणि फक्त गुजरातचा विचार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी भारतात गुंतवणूक करणाऱ्या कॉर्पोरेट्सना भेटले. यापैकी 2 मोठी गुंतवणूक गुगल आणि मायक्रोनने केली.”

“या गुंतवणूक काय आहेत?

👉Google ने जाहीर केले की ते डिजिटल ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सुरू करणार आहे. कुठे?
गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT) गांधीनगर, गुजरात येथे.

👉 सिंगापूर एक्सचेंज (SGX) ने सिंगापूरमधील सर्व निफ्टी डेरिव्हेटिव्ह ट्रेड्स गुजरात मध्ये हलवले.

👉 $825 दशलक्ष गुंतवणूक असलेले मायक्रोन सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प साणंद, अहमदाबाद जिल्हा, गुजरात येथे”, असही त्यांनी (Vijay Wadettivar) या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चा उधाण आलं आहे. वडेट्टीवार यांच्या ट्विटवर सत्ताधारी पक्ष काय प्रतिक्रिया देईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PH6LXQ