Weather Update | हवामानात होणार पुन्हा मोठा बदल! पंजाबराव डख यांनी व्यक्त केला अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सध्या सातत्याने बदल होताना दिसत आहे. कुठे अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर कुठे उन्हाची तीव्रता (Intensity of summer) वाढत चालली आहे. या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशात राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी व्यक्त केला आहे.

राज्यामध्ये 21 एप्रिलपासून ते 28 एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे. त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांची पुन्हा एकदा डोकेदुखी वाढणार आहे. शेतकऱ्यांनी उर्वरित कामं लवकरात लवकर उरकून घ्यावी, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, आज देखील राज्यातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त (Weather Update) केला आहे. राज्यात आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन देखील हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी उष्णताची तीव्रता कमी होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या