Aaditya Thackeray | एकनाथ शिंदेंनी मित्रपरिवारावर पैसा उडवला?; दावोस दौऱ्यावरुन आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप

Aaditya Thackeray | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अलीकडेच आपल्या शिष्टमंडळासह डाव्होस दौऱ्यावर गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरुन राज्यातील अनेक राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. आता मात्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे.

“चार दिवसांच्या या डाव्होस दौऱ्यात साधारणत: 35 ते 40 कोटी रुपये अंदाजित खर्च झाला. म्हणजेच दिवसाला साडेसात ते दहा कोटी खर्च झाला”, असा दावा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा हस्यास्पद होता, असं विधानही आदित्य ठाकरेंनी केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

“दावोस दौऱ्यातून महाराष्ट्रात दीड लाख कोटींची गुंतवणूक आली, असा दावा सरकारकडून जात आहे. दावोसमध्ये महाराष्ट्र सरकारचा जो अधिकृत कार्यक्रम होता, हा कार्यक्रम एकंदर चार दिवसांचा असेल असं आम्हाला वाटतं. कारण 16 ते 20 जानेवारी असा हा कार्यक्रम ठरवला होता. या कार्यक्रमासाठी आम्हाला कळालेला अंदाजित खर्च साधारणपणे 35 ते 40 कोटींच्या घरात आहे. चार दिवसांसाठी 40 कोटी खर्च केले. यामध्ये आणखी नवीन खर्च वाढू शकतो, तिकडे मित्रपरिवार गेला होता? तिथे कोणत्या गाड्या वापरल्या? याचा तपशील पुढे येणं आवश्यक आहे”, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

“मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दिवसाला 10 कोटी रुपये खर्च केला आहे. त्यांनी दावोसमध्ये मोठं पव्हेलियन घेतलं असेल. पण सरकारमध्ये खर्च कसा दाखवायचा हे त्यांना चांगलं माहिती आहे. अजून एक महत्त्वाचे म्हणजे, दावोसला जाताना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाचा वापर केला. यावर दोन ते अडीच कोटी खर्च झाला असेल. हा सर्व खर्च राज्यावर आला असेल. माझा चार्टर्ड विमानाला विरोध नाही. पण तुम्ही कमर्शिअल विमानाऐवजी चार्टर्ड विमानाचा वापर लवकर पोहोचण्यासाठी करता. पण एकनाथ शिंदे उशिरा पोहोचले,” असा दावा देखील आदित्य ठाकरेंनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या