Ajit Pawar । “महाराष्ट्र दिनानिमित्त जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेद विसरुन विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊया” : अजित पवार

Ajit Pawar | मुंबई : आज म्हणजेच १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं म्हणून महाराष्ट्रात हा दिवस मराठी माणूस मोठ्या उत्साहाने साजरा करतो. या दिवसाला कामगार दिन देखील म्हटलं जातं. तर आज ६३ वा महाराष्ट्र दिन सर्वत्र साजरा केला जात आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात येते. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी ट्वीट करत महाराष्ट्र दिनासह कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसचं महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या वीरांना त्यांनी अभिवादन देखील केलं आहे.

काय म्हणाले अजित पवार (What did Ajit Pawar say)

“राज्यातील जनतेला ‘महाराष्ट्र दिना’च्या (Maharashtra Day) मनापासून शुभेच्छा देतो. यासह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात शहीद झालेल्या १०६ वीरांना अभिवादन करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या त्यागाबद्दल तसंच संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात योगदान देणाऱ्या समस्त महाराष्ट्र वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.” याचप्रमाणे महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्मलेल्या शेतकरी, कष्टकरी, साहित्यिक, कलाकार, खेळाडू, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या कष्टातून हा महाराष्ट्र घडला आहे. यामुळे या महाराष्ट्राच्या सुपुत्राबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. असं अजित पवार म्हणले.

“महाराष्ट्र दिनानिमित्त जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेद विसरुन विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊया” (“On the occasion of Maharashtra Day, let’s forget caste, religion, creed, region, language, party differences and unite on the issue of development)

तसचं “महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेद विसरुन विकासाच्या मुद्यावर एकत्र येऊया. देशाची एकता, समता, बंधुता, सार्वभौमत्वाची भावना कायम ठेवूया. देशाची लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊया,” असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे. याचप्रमाणे अख्ख्या जगाची चाकं कामगारांच्या श्रमशक्तीवरच फिरत असतात. कामगारांच्या घामावरच जगाचा रहाटगाडा सुरु असतो. कामगार दिनाच्या निमित्तानं जगभरातील कामगारांना, त्यांच्या श्रमशक्तीला वंदन करतो. कामगार बंधु-भगिनींना, त्यांच्या कुटुंबियांना आजच्या कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो,” अशा शुभेच्या देखील अजित पवार यांनी म्हटलं.

दरम्यान, अजित पवार यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेबद्दल देखील भाष्य केलं. आपण आज महाराष्ट्र दिन साजरा करत आहोत बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह सीमाभागातली मराठी भाषक ८१४ गावं महाराष्ट्रात सामील करण्याचं आपलं स्वप्न आजही अपूर्ण आहे. ते स्वप्न पूर्ण होईपर्यंत संयुक्त महाराष्ट्राचा आपला लढा कायम राहील. असा निर्धारही अजित पवारांनी व्यक्त केला आहे. तसचं हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांच्या विचारांवर चालतो त्यांना देखिल मानवंदना केली. तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनाही वंदन करतो,” असं अजित पवारांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-