Chhagan Bhujbal | छगन भुजबळ यांना फोनवरून मिळाली जीवे-मारण्याची धमकी

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ भाजप-शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना जिवे-मारण्याची धमकी देण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना फोनवरून ही धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्याच्या फोनवर हा धमकीचा फोन आला होता.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या कार्यालयात हा धमकीचा फोन कॉल आला होता. तुम्हाला जीवे-मारण्याची सुपारी मिळाली असल्याचं त्या व्यक्तीनं फोनवर सांगितलं. मला तुम्हाला मारण्याची सुपारी मिळालेली असून उद्याच मी तुम्हाला मारणार आहे, असं त्या व्यक्तीनं म्हटलं. या धमकीच्या फोननंतर पोलिसांनी लगेच याबाबत तपास सुरू केला.

Police has arrested the young man who threatened Chhagan Bhujbal

दरम्यान, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना धमकी देणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केलं आहे. पुणे पोलिसांकडून या दोषी तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्याची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. जीवे-मारण्याची धमकी मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) सध्या पुण्यातील शासकीय विश्रामगृहात मुक्कामी आहे. त्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यानंतर आज ते पुण्याहून मुंबईला निघणार आहे. छगन भुजबळ यांना मिळालेल्या धमकीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NPTmu1