Chhagan Bhujbal | जयंत पाटलांना मिळणार डच्चू? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदासाठी छगन भुजबळ इच्छुक

Chhagan Bhujbal | टीम महाराष्ट्र देशा: काल (21 जुन) झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली होती. अजित पवारानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

माध्यमांशी संवाद साधत असताना छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले, “आमचा पक्ष लोकशाहीवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे पक्षात प्रत्येकजण आपलं मत व्यक्त करतो. काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) ओबीसीचे आहे. त्याचबरोबर चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule ) आणि संजय राऊत (Sanjay Raut) देखील ओबीसीचे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत असलेल्या ओबीसी नेत्यांना संधी मिळाली पाहिजे.”

NCP should give responsibility to OBCs leader – Chhagan Bhujbal

पुढे बोलताना ते (Chhagan Bhujbal) म्हणाले, “राष्ट्रवादीने ओबीसीला जबाबदारी दिली पाहिजे. त्यामुळे ओबीसी समाज जोडला जाईल. मला ही जबाबदारी दिली तर मी ती व्यवस्थित पार पडेल.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर पाच वर्षापासून जयंत पाटील (Jayant Patil) विराजमान आहे. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या या वक्तव्यानंतर जयंत पाटलांना या पदावरून हटवले जाईल का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्याचबरोबर भुजबळ यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/chhagan-bhujbal-is-interested-for-the-post-of-state-president-of-ncp/?feed_id=45523