Eknath Shinde | “काही लोक न्यायालयालाच…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर

Eknath Shinde | मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात खरी शिवसेना शिंदे गटची की ठाकरे गटची? हा वाद रंगला आहे. पक्षाच्या दोन्ही गटांकडून आपणच खरी शिवसेना असल्याचे दावे केले जात आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हं ठाकरे गटाला मिळाल्यास शिंदे गटाचं काय होणार? असा सवाल केला जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्हं हातून गेल्या शिंदे गट भाजपमध्ये प्रवेश करू शकतो का? याबाबत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपलं मत व्यक्त करताना एक दावा केला आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

Uddhav Thackeray talk about Shinde group

“आमच्या घटनेत प्रमुख नेता हे पदच नाही. शिंदे गट भाजपमध्ये जाऊ शकत होते. आता ते भाजपमध्ये जाऊ शकणार नाही. कारण त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे. भाजपनेही त्यांना मधल्यामध्ये लटकून ठेवलं आहे. शिंदे गटाचा भाजपमध्ये समाील होण्याचा पर्याय संपुष्टात आला आहे”, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंच्या या दाव्यावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे.

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदे घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली. तसेच १६ आमदारांच्या अपात्रेबाबत निकाल येत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाने चिन्हाबाबात निर्णय देऊ नये, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी प्रतिक्रिया दिली आहे.

“यावर आम्ही काय बोलायचं?”(Eknath Shinde Comment on Uddhav Thackeray)

“आमदारांचं प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे आणि आमचा न्यायालयावर विश्वास आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच काही लोकं सर्वोच्च न्यायालयालाच मार्गदर्शन करत असतील, तर त्यावर आम्ही काय बोलायचं?”, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-