Eknath Shinde | मुख्यमंत्र्यांनी जेवणासाठी शासनाच्या तिजोरीतून उडवले तब्बल २ कोटी; माहिती अधिकारातून उघड

Eknath Shinde | बारामती : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून 3 महिन्यात जेवणासाठी यांनी शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. याबाबतची माहिती ‘माहिती अधिकारातून’ उघड झाली आहे. बारामती येथील आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन सदर माहिती मिळवली आहे. नितीन यादव यांनी ट्विट करत सदर माहिती उघड केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर खानपान सेवेसाठी 1 जुलै ते 31 ऑक्टोंबर या 123 दिवसात 2 कोटी 38 लाख 34 हजार 958 रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. यावरुन दिवसाला सुमारे 1 लाख 93 हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकिय निवास्थानावर होत असल्याची धक्कादायक माहिती आता माहितीच्या अधिकारतून समोर आली आहे. नितीन यादव यांनी याबाबत ट्वीटही केले आहे.

नितीन यादव यांना शिंदे सरकारने नुकतेच 7 महिन्यात जाहिरातींसाठी 42 कोटी रुपये शासकीय तिजोरीतुन खर्च केल्याची माहिती माहिती अधिकारात मिळाली होती त्यानंतर आता यादव यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या वारेमाप खर्चाची धक्कादायक माहिती मिळाली आहे. यामध्ये सोबत ‘सहयाद्री’ अतिथिगृहातील चहा, कॅाफी नाश्त्यासाठी 8 दिवसात 91 हजार 500 रुपयांचा खर्च केल्याचे समोर आले आहे.

‘मुख्यमंत्री बैठक आणि त्यांच्या भेटीसाठी आलेल्या व्यक्तींसाठी चहा कॅाफी थंडपेयेसाठी 3 लाख 49 हजार 929 रुपयांचा खर्च केल्याची माहिती या पत्रात आढळून येत आहे. त्यामुळे वारेमाप होणाऱ्या या उधळपट्टीवर अकुंश लावण्यासाठी शिंदे सरकारने प्रयत्न करावेत’ अशी विनंती नितीन यादव यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-