Gujrat Travel Guide | गुजरातला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं नक्की करा एक्सप्लोर

Gujrat Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: फेब्रुवारी महिना सुरू होत आहे. फेब्रुवारी महिन्यातील वातावरण फिरण्यासाठी अतिशय उत्तम असते. तुम्ही पण या महिन्यात फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही गुजरातला भेट देऊ शकतात. गुजरात राज्य संस्कृती आणि सभ्यतेसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला अनेक प्रेक्षणीय स्थळे बघायला मिळतील. तुम्ही पण जर गुजरातला भेट देण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही पुढील ठिकाणांना एक्सप्लोर करू शकतात.

कच्छ

तुम्ही जर गुजरातला फिरायला जाण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही कच्छला नक्की भेट दिली पाहिजे. या ठिकाणी दरवर्षी कच्छ महोत्सव आयोजित केला जातो. या कार्यक्रमाला देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. येथे तुम्ही कंठकोट किल्ला, नारायण सरोवर मंदिर, भद्रेश्वर जैन मंदिर इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकतात.

द्वारका

द्वारका शहर हे भगवान श्रीकृष्णाची राजधानी होती, असे महाभारत काव्यात वर्णन केलेले आहे. द्वारका ही एक अतिशय पवित्र नगरी आहे. या ठिकाणी तुम्हाला 2500 वर्ष जुनी मंदिर बघायला मिळतील. द्वारकेमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. तुम्ही जर गुजरात दौरा करायचा विचार करत असाल, तर तुम्ही द्वारकेला नक्की भेट दिली पाहिजे.

अहमदाबाद

गुजरातच्या संस्कृतीची ओळख करून घ्यायची असेल, तर तुम्ही अहमदाबादला भेट देऊ शकतात. या ठिकाणी तुम्हाला गुजरातचे खाद्यपदार्थ आणि गुजरातच्या संस्कृतीची ओळख होईल. अहमदाबादमध्ये तुम्हाला अनेक प्रेक्षणीय स्थळे बघायला मिळतील. त्यामुळे गुजरात फिरायला गेल्यावर अहमदाबाद भेट द्यायला विसरू नका.

वडोदरा

वडोदरा हे शहर बडोदा म्हणून देखील प्रसिद्ध आहे. हे गुजरातमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. वडोदरा विश्वमित्री नदीच्या काठावर वसलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला वडोदरा म्युझियम, लक्ष्मी विलास पॅलेस, सुखसागर तलाव, सयाजी गार्डन इत्यादी स्थळांना भेट देता येईल. त्यामुळे तुम्ही जर गुजरतला फिरायला जाण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही तुमच्या यादीमध्ये वडोदऱ्याचा समावेश केला पाहिजे.

महत्वाच्या बातम्या