Gulabrao Patil | “बाळासाहेब ठाकरे त्यांचे वडील आहेत मान्यय पण…”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर गुलाबरांचं वक्तव्य

Gulabrao Patil | मुंबई : खेडमधील एका सभेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली. तसेच “हे ढेकूण चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यांच्या या टीकेला आता  शिंदे गटाचे नेते, आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Gulabrao Patil Comment on Uddhav Thackeray

“बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करू नका, हिंमत असेल तर तुमच्या बापाचं नाव वापरा आणि मतदान मागून दाखवा, असं उद्धव ठाकरे आतापर्यंत पाच-सहा वेळी म्हणाले आहेत. याला एवढं महत्त्व देणं चुकीचं होईल. शेवटी महापुरुषांचे फोटो, नाव वापरणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे. ती त्यांची संपत्ती नाही”, असे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

“त्यांना धनुष्यबाण घेऊन येता येणारच नाहीये”

“बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरेंचे वडील आहेत, हे मान्य आहे. मात्र, ते या देशाची आणि हिंदू समाजाची संपत्ती आहेत. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कुणीही वापरू शकतं. उद्धव ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिलंय. त्यामुळे त्यांना धनुष्यबाण घेऊन येता येणारच नाहीये. त्यांना जे चिन्ह दिलंय त्यावरच ते लढणार आहेत.”, असेही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

“होळीच्या दिवशी मी त्यांच्यावर अधिक बोलणं उचित होणार नाही. परंतू ‘आगे आगे देखो होता हैं क्या’. अजून वर्ष-दीड वर्ष बाकी आहे,” असा सूचक इशाराही गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाला दिला आहे.

उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका

“निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. मैदानाचे नावं चांगलं आहे, गोळीबार मैदान. पण, ही ढेकूण चिरडायला गोळीबाराची गरज नाही. तुमचे एक बोट मतदानाच्या दिवशी यांना संपवेल. ज्यांना आपलं कुटुंबीय मानलं, त्यांची आपल्यावर वार केले.”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-