Heat Stroke | उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश

Heat Stroke | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये उष्णघाताची समस्या खूप सामान्य आहे. उन्हाळ्यामध्ये बहुतांश लोकांना उष्माघाताचा त्रास होतो. यामध्ये डोकेदुखी, चिडचिड, मळमळ इत्यादी समस्या निर्माण होतात. त्यामुळे उष्माघाताच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक औषधांचे सेवन करतात. मात्र, सतत औषधांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे उष्माघातावर मात करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही खाद्यपदार्थांचा समावेश करू शकतात. उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात खालील खाद्यपदार्थांचा समावेश करू शकतात.

काकडी (Cucumber-For Heat Stroke)

उन्हाळ्यामध्ये काकडी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्याचबरोबर काकडीमध्ये विटामिन सी, विटामिन के, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी पोषक घटक आढळून येतात, जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नियमित काकडीचे सेवन केल्याने तुम्ही उष्णघातापासून दूर राहू शकतात.

दही (Curd-For Heat Stroke)

दही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दही शरीरात प्रोबायोटिकचे काम करते. दह्याचे नियमित सेवन केल्याने पचनक्रियाही मजबूत राहते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये नियमित दह्याचे सेवन केल्याने तुम्ही उष्माघातापासून दूर राहू शकतात.

कांदा (Onion-For Heat Stroke)

उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही कांद्याचे सेवन करू शकतात. कांद्याचे नियमित सेवन केल्याने शरीर थंड राहू शकते. उन्हाळ्यामध्ये कांदा खाल्ल्याने उष्णतेचा शरीरावर परिणाम होत नाही. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात कांद्याचा समावेश करू शकतात.

उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात वरील गोष्टींचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर नियमित ग्रीन टीचे सेवन केल्याने हृदयाच्या आरोग्याला खालील फायदे मिळू शकतात.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते (Cholesterol remains under control-Green Tea For Heart)

रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहणे ह्रदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असते. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त राहिल्याने रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो. हा धोका टाळण्यासाठी तुम्ही नियमित ग्रीन टीचे सेवन करू शकतात. ग्रीन टीचे सेवन केल्याने रक्तातील एचडीएल म्हणजेच चांगल्या कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते आणि खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Green Tea For Heart)

हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी वजन नियंत्रणात राहणे खूप महत्त्वाचे आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी ग्रीन टीचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. नियमित ग्रीन टीचे सेवन केल्याने मेटाबोलिझम वाढते आणि पचनक्रिया मजबूत होते. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर ग्रीन टीचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या