IND vs NZ | मालिका जिंकण्यासाठी निवड समिती घेणार मोठा निर्णय! ‘हा’ खेळाडू होऊ शकतो संघातून बाहेर

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये टी-20 सामने खेळले जात आहे. आज न्यूझीलंडविरुद्धचा शेवटचा म्हणजेच निर्णायक टी-20 सामना खेळला जाणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियात (Team India) मोठे बदल बघायला मिळू शकतात. या सामन्यामध्ये शुभमन गिल (Shubhaman Gill) ऐवजी पृथ्वी शॉ (Prithwi Show) ला संधी मिळेल का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेमध्ये शुभमन गिल आणि इशान किशन (Ishan Kishan) अपयशी ठरले आहे. इशान टीम इंडियाचा यष्टीरक्षक असल्यामुळे त्याला संघात कायम ठेवल्या जाऊ शकते. मात्र, शुभमन गिलच्या जागी पृथ्वी शॉचा संघाचा समावेश केला जाऊ शकतो. मालिका आपल्या नावावर करण्यासाठी संघ व्यवस्थापनाला हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये शुभमन गिलने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला टी-20 मालिकेत प्राधान्य मिळाले होते. मात्र, पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे तिसऱ्या म्हणजेच निर्णायक सामन्यामध्ये त्याच्या जागी पृथ्वी शॉला संघात संधी मिळू शकते.

विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये संघात राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) ला संधी देण्यात आली आहे. मात्र, गिल आणि इशानप्रमाणे तो देखील या मालिकेमध्ये अपयशी ठरला आहे. संघ व्यवस्थापनाने गिलला संघातून वगळले नाही, तर संघ व्यवस्थापन राहुल त्रिपाठीला संघातून वगळू शकतो.

महत्वाच्या बातम्या