Jitendra Awhad | “शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी…”; जितेंद्र आव्हाड यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Jitendra Awhad | ठाणे: पहिल्या पावसानंतर मुंबईमध्ये जागोजागी पाणी साचलं होतं. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. त्यानंतर आता या प्रकरणावरून जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शासन आपल्या दारी आता ठाणेकरांची बारी, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) केली आहे.

ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले,”पहिल्या 2 दिवसाच्या पावसातच ठाण्यात पाणी तुंबले आहे.असा प्रकार ठाण्यात कधीच होत नव्हता.विशेष म्हणजे नाले सफाईची पाहणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी केली होती. “ठाण्यात पाणी तुंबनार,त्याकडे लक्ष द्या”,अशी विनंती मी अनेक वेळा ठाणे आयुक्त यांच्याकडे केली होती.परंतु मुख्यमंत्र्यांच्या “विशेष सेवेत” दंग असणाऱ्या आयुक्तांना याकडे लक्ष देण्यास बहुदा वेळ मिळाला नसावा.”

Our Chief Minister is so nice – Jitendra Awhad

“आता लवकरच मुख्यमंत्री,”पाऊस आला याच कौतुक करा..ठाणे तुंबल याची तक्रार काय करता..!” सारखं स्टेटमेंट देतील,अशी मला खात्री आहे.

“शासन आपल्या दारी
आता ठाणेकरांची बारी..
घेऊन आले पावसाचे पाणी,
मुख्यमंत्री आहेतच आपले इतके भारी..!”, असही ते (Jitendra Awhad) या ट्विटमध्ये म्हणाले आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसापासून ठाण्यासह मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे ठाणेकरांची तारांबळ उडाली आहे. त्याचबरोबर पावसामुळे जागोजागी पाणी साचलेलं असून वाहतुकीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी हे ट्विट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/46phs7x