Job Opportunity | केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग (Central GST and Customs Department), पुणे यांच्यामार्फत काही रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया निघाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील जारी करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

केंद्रीय कर आणि सीमा शुल्क विभाग यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 11 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये कर सहाय्यक – 02 पदे, स्टेनोग्राफर ग्रेड-II- 06 पदे आणि हवालदार – 03 पदे भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

पात्र आणि इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) दिनांक 25 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.cbic.gov.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://bit.ly/3oFPnYi

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

सह आयुक्त, (CCC) मुख्य आयुक्त कार्यालय, केंद्रीय जीएसटी आणि  कस्टम्स,  पुणे झोन, GST भवन, वाशिया कॉलेजसमोर, 41/ए. ससून रोड, पुणे – 411001.

महत्वाच्या बातम्या