Kayaking Destination | मित्रांसोबत कयाकिंगचा आनंद घेण्याचा विचार करत असाल, तर ‘ही’ ठिकाणं ठरू शकतात सर्वोत्तम पर्याय

Kayaking Destination | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल स्कुबा डायव्हिंग, कयाकिंग, ट्रेकिंग, रिव्हर राफ्टिंग, बोटिंग इत्यादी गोष्टींचा ट्रेंड खूप वाढला आहे. सोशल मीडियामुळे आणि चित्रपटांमुळे लोक या गोष्टींकडे आकर्षित होत चालले आहे. या ॲक्टिव्हिटी करण्यासाठी लोक वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत असतात. तुम्ही पण जर वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही योग्य बातमी वाचत आहात. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्वोत्तम कयाकिंग ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. कयाकिंग करण्यासाठी तुम्ही पुढील ठिकाणांना भेट देऊ शकतात.

ऋषिकेश

वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ऋषिकेश एक उत्तम पर्याय आहे. या ठिकाणी तुम्ही गंगा नदीमध्ये कयाकिंगचा आनंद घेऊ शकतात. वॉटर सपोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी गंगेच्या काठावर सर्व सुविधा उपलब्ध आहेत. ऋषिकेशमध्ये तुम्ही कयाकिंग सोबतच निसर्ग सौंदर्याचा देखील आनंद घेऊ शकतात.

गोवा

कयाकिंग करण्यासाठी गोवा हे एक उत्तम ठिकाण आहे. गोव्यातील मांडवी नदीवर तुम्हाला कयाकिंगचा आनंद घेता येईल. गोव्यामध्ये तुम्हाला कयाकिंगसोबत अनेक गोष्टी करायला मिळतील. या ठिकाणी समुद्रकिनारी तुम्ही तुमची सुट्टी निवांत साजरी करू शकतात.

लडाख

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजेच काश्मीरला भेट देण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी जातात. तुम्ही लडाखला कयाकिंगसाठी जाऊ शकतात. लडाखमध्ये तुम्ही झांस्कर नदीमध्ये मित्रांसोबत कयाकिंगचा आनंद घेऊ शकतात.

कुमारकोम

केरळ हे निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. केरळमधील कुमारकोम हे ठिकाण कयाकिंगसाठी ओळखले जाते. हे शहर वेंबनाड तलावाच्या काठावर वसलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्वोत्तम कयाकिंगचा अनुभव घेता येईल.

महत्वाच्या बातम्या