Keshav Upadhye | शरद पवारांना ‘भावी’ प्रधानमंत्री होण्याची घाई झाली – केशव उपाध्ये

Keshav Upadhye | टीम महाराष्ट्र देशा: बिहारच्या पाटणा शहरात 23 जून रोजी विरोधी पक्षांची बैठक पार पडली होती. या बैठकीला देशासह राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आदी नेत्यांचा समावेश होता. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांना भावी प्रधानमंत्री होण्याची घाई झाली असल्याचं उपाध्ये यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विट करत केशव उपाध्ये म्हणाले, “खरोखर जातीय दंगलींबाबत गांभीर्य असते, तर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गृहमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक होते. परंतु, त्यांना पाटणा येथील सर्वपक्षीय बैठकीची आणि पुन्हा ‘भावी’ पंतप्रधान होण्याची घाई झाली आहे. बैठकीला उपस्थित राहण्याचे टाळल्याने बैठकांबाबत सूचना किंवा सल्ले देण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे.”

Sharad Pawar’s attempt to ‘target’ the BJP will never succeed – Keshav Upadhye

“जातीय तेढ आणि सांप्रदायिकता हे मुद्दे मांडून विनाकारण भाजपला ‘लक्ष्य’ करण्याचा पवार यांचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही”, असही केशव उपाध्ये यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे. केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू होणार आहे.

दरम्यान, विरोधी पक्षाच्या बैठकीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले, “विरोधी पक्षाच्या बैठकीमध्ये महागाई, बेरोजगारी, समाजातील वाद या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. आमच्या या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3NPr3xj