Shambhuraj Desai | “कोण शंभु की चंबू?”; संजय राऊतांच्या टीकेवर शंभूराज देसाईंचा पलटवार, म्हणाले..

Shambhuraj Desai | मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता आपला मोर्चा दुसरीकडे वळवला आहे. संजय राऊत यांनी आता थेट चार राजांवर टीका केली आहे. यापैकी छत्रपती घराण्यातील तीन राजांसह शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावरही संजय राऊत यांनी तोंडसुख घेतलं आहे. छत्रपती घराण्याने भाजपला साथ दिल्यामुळे संजय राऊत यांनी टीका केली आहे. तर, शंभुराजे देसाई हे शिंदे गटासोबत गेल्याने त्यांच्यावरही सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्या या टीकेला शंभुराजे देसाई यांनी तिखट शब्दात उत्तर दिलं आहे.

Sanjay Raut criticize Shambhuraj Desai

राऊत यांनी मंत्री शंभुराजे देसाई यांच्यावरही टीकास्त्र सोडले होते. अनेक लोक शिवसेना सोडून गेले. पण शिवसेनेची बस कधी रिकामी राहिली नाही. आपली बस नेहमी फुल्ल असते. पुढून 50 उतरले तर मागून 100 चढतात. आपली बस नेहमीच फुल असते. काय ते पाटणचं पापाचं पित्तर कोण ते? शंभु की चंबू ? अरे शिवसेना नसती तर तुझ्या घराण्याला मंत्रीपद मिळालं असतं का? 37 वर्षानंतर तुम्हाला मंत्रीपद मिळालं. तुमच्या घराण्याला मिळालं, असे म्हणत संजय राऊतांनी शंभूराज देसारईंवर टीका केली होती.

Shambhuraj Desai Replied to Sanjay Raut

“संजय राऊत यांच्या डोक्यवर 100 टक्के परिणाम झाला आहे. त्यामुळेच ते निवडणूक आयोग आणि न्याय व्यवस्थेवर टीका करत आहेत. आता ते माझ्यावर टीका करत आहेत. मी 3 टर्म आमदारकीला निवडून आलो आहे. मी शिवसेनेते प्रवेश केला त्यानंतर पाटणमध्ये शिवसेना वाढली. आम्ही प्रामाणिकपणे बाळासाहेबांच्या विचारांनी काम केले. हे संजय राऊतांना माहीत नसेल. जो आमचा मतदारसंघ हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा बालेकिल्ला होता. तेथे तीन वेळा शिवसेनेचा आमदार निवडून आणला”, असं म्हणत शंभूराज देसाई राऊतांवर आक्रमक झाले आहेत.

“राऊत आमच्या मतावर राज्यसभेत गेलेत”

“जे संजय राऊत कधी ग्रामपंचायतला निवडून आले नाहीत त्यांनी आमच्यावर टीका करू नये. संजय राऊत आमच्या मतावर राज्यसभेत गेले. त्यामुळे आधी त्यांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं आव्हानच त्यांनी राऊत यांना दिलं. त्यात ठाकरे गट कुठे असेल? : शंभुराजे महाविकास आघाडी 200 जागा जिंकणार असल्याचं ते म्हणत आहेत. मग त्यात उद्धव ठाकरे यांचा गट कुठे असेल ते सांगा. काल कसब्यात काँग्रेसचा विजय झाला तरी जल्लोष हा ठाकरे गटाने जास्त केला. मविआत ठाकरे गट राहते की नाही हा प्रश्न आहे .शिवसेना हे नाव आम्हाला मिळाले आहे. त्यामुळे आता तो शिवसेना ठाकरे गट नसून फक्त उद्धव गट आहे, अशी टीकाही देसाई यांनी केली.

“तुमचे 100 बाप आले पाहिजे”

“बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्रातील राजकारणातील मोठं नाव होऊन गेलं. त्यांनी राज्याचं नेतृत्व केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरेंबरोबर शिवसेनेला ताकद देण्याचं काम बाळासाहेब देसाई यांनी केलं. हे आम्ही विसरणार नाही. अन् ही कालची कार्टी. आमच्या पाठीत खंजीर खुपसत आहे. त्यांना काय वाटतं शिवसेना संपणार आहे? तुमचे 100 बाप आले पाहिजे”, असा हल्लाबोल राऊत यांनी केला होता.

महत्वाच्या बातम्या-