Sharad Pawar | “माझी राज्य शासनाला विनंती आहे की…”; इर्शाळवाडी घटनेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

Sharad Pawar | रायगड: काल रात्री रायगड जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे पावसामुळे दरड कोसळली आहे. या दराडीखाली अख्खी वस्ती दबली गेली आहे. या घटनेनंतर रायगड जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

इर्शाळवाडीमध्ये घडलेल्या घटनेवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर शरद पवार यांनी ट्विट करत आपत्कालीन बचाव कार्य राबवून ढिगार्‍याखाली अडकलेल्या गावकऱ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला विनंती केली आहे.

The incident of landslide on Irshalwadi village in Khalapur is very sad – Sharad Pawar

ट्विट करत शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “खालापूर येथील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळण्याची घटना अत्यंत दुःखद आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांवर अस्मानी संकट कोसळलं आहे. पीडितांच्या दुःखात सहभागी आहोत.

राज्य शासनाला विनंती आहे की, संबंधित घटनेच्या ठिकाणी युद्धपातळीवर आपत्कालीन बचाव कार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गावकऱ्यांना सुखरूपपणे सुस्थितीत बाहेर काढावे.”

दरम्यान, काल (19 जुलै) रात्री 10.30 ते 11 वाजता ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली (Sharad Pawar) आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू झालेले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील या ठिकाणी रवाना झाले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3XXHkng