Skin Care Tips | चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो ‘या’ तेलांचा वापर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच निरोगी आणि चमकदार त्वचा (Skin) हवी असते. पण बदलत्या जीवनशैलीमुळे आणि अनियमित आहारामुळे चेहऱ्यावरील अनेक समस्या वाढतात. यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे डाग यायला सुरुवात होते. त्यामुळे चेहरा ठिसूळ आणि निस्तेज दिसायला लागतो. त्यामुळे चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करतात. मात्र अनेकदा या पद्धतींचा दुष्परिणाम चेहऱ्याला भोगावा लागतो. कारण केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेला हानी पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही पण जर चेहऱ्यावरील डाग कमी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील डाग काढण्यासाठी काही रामबाण उपाय सांगणार आहेत. पुढील तेलांचा वापर करून तुम्ही चेहऱ्यावरील डाग दूर करू शकतात.

चेहऱ्यावरील (Skin) डाग दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो ‘या’ तेलांचा वापर

लेमन एसेन्शियल ऑइल

लेमन एसेन्शियल ऑइल म्हणजेच लिंबाचे तेल चेहऱ्यावरील डाग साफ करण्यास मदत करू शकतात. यासाठी तुम्हाला हलक्या हाताने लिंबाचे तेल चेहऱ्यावर लावून मसाज करावी लागेल. याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात. त्याचबरोबर त्वचेवरील रंग सुधारू शकतो.

लॅव्हेंडर एसेन्शियल ऑइल

लॅव्हेंडर एसेन्शियल ऑइल त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. या तेलाच्या मदतीने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतात. त्याचबरोबर याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील डाग दूर होऊ शकतात. लॅव्हेंडर एसेन्शियल ऑइल त्वचेला मॉइश्चराईज करते. त्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार राहू शकते.

जेरेनियम ऑइल

जेरेनियम ऑइलच्या नियमित वापराने हाइपरप्रेग्नेंटेशनची समस्या दूर होऊ शकते. कारण या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. हे गुणधर्म त्वचेवरील समस्या दूर करण्यास मदत करतात. त्याचबरोबर या तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील डागांची समस्या दूर होऊ शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या