Supriya Sule | “तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्या”; वाढत्या गुन्हेगारीवरुन सुप्रिया सुळे गृहमंत्री फडणवीसांवर आक्रमक

Supriya Sule | पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. शहरात कोयता गँगने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे या दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर आंदोलनासाठी आल्या होत्या. त्यावेळी बोलत असताना सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांना लक्ष्य केले आहे.

“पुण्यात कोयता गँग असेल तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढत आहे. तसेच महिलांना धमकीण्याचे प्रकार घडत आहे. त्यामुळे सर्व घटना लक्षात घेता यामध्ये गृह मंत्रालयाचे अपयश असून, त्यामुळे ‘गृहमंत्री जवाब दो’ या राज्यात काय चाललंय?. जर तुम्हाला झेपत नसेल तर राजीनामा द्यावा”, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

आणखी काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

केंद्र सरकारने ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांगांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

दरम्यान, सुपिया सुळे यांनी या आंदोलनाच्या वेळी प्रकाश आंबेडकर, पुण्यातील पोटनिवडणुकीवर भाष्य केले. त्यातच वाढत्या गुन्हेगारीवरुन केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.

महत्वाच्या बातम्या :