Religious Travel Guide | धार्मिक स्थळांना भेट देण्याची योजना आखत असाल, तर यादीमध्ये ‘या’ ठिकाणांचा करा समावेश

Religious Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: नवस पूर्ण करण्यासाठी किंवा एखाद्या शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी अनेकजण धार्मिक ठिकाणांना भेट देतात. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीला अधिक जवळून बघण्यासाठी विदेशी पर्यटक या धार्मिक स्थळांना भेट देतात. कारण या ठिकाणी भारताची संस्कृती आणि परंपरा दिसून येते. तुम्ही पण जर अशाच धार्मिक यात्रेला जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला भारतातील धार्मिक स्थळांबद्दल माहिती सांगणार आहोत. तुम्ही पुढील धार्मिक स्थळांना भेट देऊ शकतात.

बिर्ला मंदिर, मथुरा

तुम्ही जर देव दर्शनाला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मथुरेतील बिर्ला मंदिरला भेट देऊ शकतात. मथुरा हे शहर धार्मिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्हाला भगवान कृष्णाचे अनेक रूपं बघायला मिळतील. हे मंदिर मथुरा स्टेशनपासून सहा किमी अंतरावर आहे. तुम्ही जर धार्मिक यात्रेची योजना आखत असाल, तर तुम्ही तुमच्या यादीत बिर्ला मंदिराचा नक्कीच समावेश केला पाहिजे.

मीनाक्षी मंदिर, मदुराई

भारतातील तमिळनाडू राज्यात स्थित असलेले मीनाक्षी मंदिर हे जगप्रसिद्ध आहे. या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू जी मंदिरात विराजमान आहे. मदुराईमध्ये तुम्हाला मीनाक्षी मंदिरासोबतच अनेक आकर्षक ठिकाणं बघायला मिळतील. त्यामुळे तुम्ही या ठिकाणाला भेट देण्याचा विचार करू शकतात.

श्री दिगंबर जैन लाल मंदिर, दिल्ली

श्री दिगंबर जैन लाल मंदिर हे देशाची राजधानी दिल्लीमध्ये स्थित आहे. हे मंदिर 1526 झाली बांधलेले आहे. या मंदिराच्या विरुद्ध बाजूला लाल किल्ला आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक देवदर्शनासाठी येतात.

सरस्वती मंदिर, वाराणसी

विद्येची देवी मा शारदाचे दर्शन घ्यायचे असेल, तर तुम्ही वाराणसीतील सरस्वती मंदिराला भेट देऊ शकतात. या मंदिराचे विशेष आकर्षण म्हणजे या ठिकाणी माता सरस्वतीची बारा रूपं आहेत. त्यामुळे तुम्ही जर धार्मिक यात्रेचा प्लॅन करत असाल तर तुम्ही वाराणसीला नक्की भेट दिली पाहिजे.

महत्वाच्या बातम्या