BJP | लोकसभा-विधानसभेसाठी भाजपचा मास्टर प्लॅन;वाचा सविस्तर

BJP | DELHI -आज देशभरात भाजपचा ४४ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. त्यानिमित्ताने देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. तर भाजपने दोन्ही निवडणुकांसाठीचं लक्ष स्पष्ट केलं आहे.

तसेच भाजपच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा तर विधानसभेच्या २०० जागा जिंकायच्या आहेत, असा निर्धार केला असल्याचं सांगितलं आहे. याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण करण्याकरिता भाजप-शिवसेना युतीच्या माध्यमातून लोकसभेच्या संपूर्ण ४८ जागा जिंकण्यासाठी जीवाचं राण करायचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समन्वयाने आपणाला २०२४ मध्ये संपूर्ण बहुमताचं सरकार आणायचं आहे. याचप्रमाणे आगामी निवडणूकित २०० प्लस जागा आपल्याला जिंकायच्या असून यासाठी ३ कोटी सदस्यसंख्या असलेला भाजप आपल्याला तयार करायच असल्याचं म्हटलं.

बावनकुळे यांचे स्वप्न, स्वप्नचं राहणार – विनायक राऊत 

तर बावनकुळे यांनी लोकसभा-विधानसभेसाठी स्पष्ट केलेल्या विधनावर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत म्हणाले की, बावनकुळे यांचे स्वप्न, स्वप्नचं राहणार. तसेच यापूर्वी देखील आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा शिवसेनेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचं देखील बावनकुळे यांनी सांगितलं होत. पण राजकीय टीका टिपणनंतर लगेचच त्यांनी असं काही झालेलं नाही असं सांगत सारवासारव केली होती.

दरम्यान, बावनकुळे यांनी मुंबईमध्ये जिल्हा प्रसिद्धीप्रमुखांच्या बैठकीत वक्तव्य करत २०२४च्या जागावाटपाबद्दल म्हटलं होते की, भाजप २४० जागा लढवणार तर ४८ जागा शिवसेना लढणार असल्याचं सांगितलं होत. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजप- शिवसेना युतीमध्ये वाद निर्माण होऊ नये म्हणून भाजपने भाषणाचा व्हिडीओच सोशल मीडियावरुन हटवला होता. परंतु त्यावेळी त्यांनी  सारवासारव करत -“आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा २४० जागा लढवण्याचा विचार करत असल्याचं वक्तव्य मी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यासाठी केलं होतं अस म्हणत निवडणुकीच्या वेळी जागावाटपाचा विचार होईल. शिंदे गटाबरोबर असलेल्या आमदारांच्या जागांपेक्षा ज्या आणखी जागा शिंदे गटाकडे जातील, त्यांना भाजपाने केलेल्या तयारीचा उपयोग होईल.” असं त्यावेळी सांगण्यात आलं होत. त्यानंतर आज त्यांनी भाजपच्या मास्टर प्लनबद्दल सांगितलं. यामुळे सध्या सर्वांचचं लक्ष येणाऱ्या २०२४च्या निवडणूकिकडे लागलं आहे. तर भाजपने आपली कंबर कसली असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-