Chitra Wagh | महिला-मुलींच्या सुरक्षेबाबत शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध; चित्रा वाघांचा विरोधकांना टोला

Chitra Wagh | मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांनी महिला सुरक्षिततेवरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेबाबत शिंदे फडणवीस सरकार कटीबद्ध आहे. त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

A young man tried to harass a woman in a local train in Mumbai – Chitra Wagh

मुंबईत लोकल ट्रेनमध्ये एका तरुणानं महिलेला त्रास देण्याचा प्रयत्न केला असल्याचं चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्विट करत म्हटलं आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत या घटनेचा घटनाक्रम सांगितला आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध आहे, असही त्यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “रात्री पावणे बाराच्या सुमारास मालाडहून एक महिला चर्नीरोडला येत असताना बॅाम्बे सेंट्रल-ग्रॅंटरोडच्या आसपास एका हरामखोरानं चालत्या ट्रेनमध्ये चढून तिच्याशी लगट करायचा प्रयत्न केला पण तिने आरडाओरडा केल्यानंतर तो समोर उभ्या असलेल्या गाडीत उडी मारून पळून गेला. २४ तारखेची ही घटना. त्या विरोधात २८ तारखेला FIR नोंदविला गेल्यानंतर पोलिसांनी तिथले सीसीटीव्ही तपासले असता त्याचा चेहरा त्यात दिसला असून त्याला पकडण्यासाठी आरपीएफ व जीआरपी यांच्या टीम कामाला लागल्या आहेत.

पण या ठिकाणी संतापजनक गोष्ट ही आहे की, रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत प्रत्येक महिला डब्ब्यात पोलिस असले पाहिजे, या नियमाचं पालन न झाल्यानेच तो संधीसाधू हरामखोर असं कृत्य करण्यासाठी धजावला. महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी रा.९ ते स.६ यावेळेत महिला डब्ब्यात पोलिस सुरक्षा असायलाच हवी…ती का नव्हती आयुक्त यांच उत्तर द्या.

सरकारने महिला मुलींच्या सुरक्षेसाठी बनविलेल्या नियमाची अंमलबजावणी करण्यात व आपल्या कर्तव्यात ज्या अधिकाऱ्याने कसूर केली आहे, त्याच्यावर नियमानुसार तात्काळ कारवाई झालीच पाहिजे ही आमची आग्रही भुमिका आहे. आज या घटनेसंदर्भात भाजप महिला मोर्चाच्या सहकाऱ्यांसह सहकाऱ्यांसह निरज जी वर्मा यांची भेट घेतली.

महिला-मुलींच्या सुरक्षेबाबत शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध आहे. त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
जे अशा घटनांचेही राजकारण करतात त्यांना मात्र मला ठणकावून एक गोष्ट सांगायची आहे, महिला अत्याचाराच्या घटना या आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही तर समाजाच्या जबाबदारीचा विषय आहे आणि ही जबाबदारी आम्हाला फार चांगल्या पद्धतीने कळते.. त्यामुळे दोषींवर कारवाई होईलच.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3CRAzJI