Devendra Fadnavis | छत्रपती संभाजीनगर हे नाव शरद पवारांना मान्य नाही – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | गंगापूर: शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष झालं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार स्थापन केलं. एक वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सगळ्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात परिवर्तन झालं, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे. त्याचबरोबर यावेळी बोलत असताना फडणवीस यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर खोचक टीका केली आहे.

No one can remove Chhatrapati Sambhaji Maharaj from our hearts – Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “छत्रपती संभाजीनगर हे नाव शरद पवार यांना मान्य नाही. या शहराचं नाव तुम्ही काहीही ठेवलं तरी मी त्याला औरंगाबादच म्हणणार. मात्र, शरद पवार यांनी कितीही औरंगाबाद म्हटलं तरी छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाही. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही.”

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्या अडीच-तीन वर्षाच्या सरकारमध्ये एकाही योजनेला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. मात्र, आमच्या सरकारनं एका वर्षात 35 योजनांना मान्यता दिली आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड योजना मागच्या सरकारनं हाती घेतली होती. मात्र, महाविकास आघाडीनं अडीच वर्षात त्या योजनेचा मुर्दा पडला आहे.”

“आज मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाले आहे. या नऊ वर्षात मोदीजींनी महाराष्ट्राला खूप काही दिलं आहे. या नऊ वर्षात मोदीजींनी महाराष्ट्राला 25 लाख घरं दिली. सव्वा कोटी लोकं मोदीजींमुळे स्वतःच्या घरात राहू लागले आहे. त्याचबरोबर मोदीजींनी 71 लाख लोकांना आरोग्य सेवा दिली आहे,” असेही ते (Devendra Fadnavis) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3XvkMK8