Eknath Shinde | उद्धव ठाकरेंकडे राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं टीकास्त्र

Eknath Shinde | मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शिंदे-फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या निकालावर आम्ही समाधानी आहोत, असं फडणवीस म्हणाले आहे. हा विजय लोकशाहीचा आणि लोकमतचा आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली. लोकशाहीमध्ये अंकांना जास्त महत्त्व असतं, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे.

पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही कायद्याला धरून सरकार स्थापन केलं आहे, हे सिद्ध झालं आहे. आम्हाला बेकायदेशीर सरकार म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने कालबाह्य केलं आहे.” उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरेंकडे बहुमत नव्हतं आणि ही बाब त्यांना माहीत होती. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. मात्र, नंतर त्यांनी त्याला नैतिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला.

“निवडणूक आयोगाने कायद्याच्या आधारेच शिवसेना पक्ष आणि प्रश्नचिन्ह आम्हाला दिलं. आम्ही नैतिकता जपली आहे. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना वाचवण्याचं काम आम्ही केलं आहे”, असं म्हणतं मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र चालवलं आहे.

“16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेणार आहे. कायद्याला धरूनच हा निर्णय होईल. आमचं सरकार बहुमताचं सरकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो”, असं ते पुढे बोलताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या