IND vs AUS | कसोटी मालिका सुरू असताना टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराहबद्दल आली ‘ही’ अपडेट समोर

IND vs AUS | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. हा सामना सुरू असताना भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियातील स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bhumrah) मालिकेच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये पुनरागमन करणार होता. मात्र, बुमराह आता पुनरागमन करू शकणार नाही. तो या संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे.

जसप्रीत बुमराह गेल्या अनेक दिवसापासून पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यासाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली नव्हती. कारण तो एनसीएमध्ये त्याच्या दुखापतीवर काम करत होता. बुमराह शेवटच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियात पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता ते आता शक्य नसल्याचे दिसत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, यावर्षी एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. त्यामुळे बुमराहने कसोटी मालिकेत पुनरागमन न करत, धोका न पत्करण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेमध्ये भाग घेण्याऐवजी बुमराहला दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी वेळ दिला जाऊ शकतो.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत नाही दिसणार जसप्रीत बुमराह? (Jasprit Bumrah will not appear in the IND vs AUS ODI series?)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यासोबतच बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकदिवसीय मालिका खेळणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 17 ते 22 मार्च दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे.

महत्वाच्या बातम्या