IND vs NZ | विराट-रोहित टी-20 संघातून कायमचे बाहेर?

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रिकेट संघ (Team India) सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. श्रीलंकेविरुद्धची (IND vs SL) मालिका संपल्यानंतर टीम इंडिया 27 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांची संघात निवड होणार नाही, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा न्यूझीलंड मालिकेसाठी निवड किंवा विचार केला जाणार नाही. भविष्यासाठी एक चांगला संघ तयार करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे निवडकर्ते हा निर्णय घेऊ शकतात. बाकी कुणालाही संघातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार नाही.”

श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेली मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 आणि एक दिवसीय मालिका खेळायची आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा समावेश असेल. मात्र, टी-20 संघामध्ये त्यांना स्थान मिळणार नाही.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये पहिला टी-20 सामना 27 जानेवारी रोजी रांची येथे होणार आहे. त्यानंतर दुसरा टी-20 सामना लखनऊमध्ये 29 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. तर तिसरा टी-20 सामना 1 फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

दरम्यान, कोलकत्ता नाईट रायडर म्हणजेच केकेआरच्या सहाय्यक प्रशिक्षकाची भूमिका निभावणारे अभिषेक नायर यांनी भारतीय संघाच्या पुढील कर्णधाराबाबत आपले मत मांडले आहे. ते म्हणाले आहेत,”रोहितनंतर श्रेयस अय्यर भारतीय संघाचे उत्तम नेतृत्व करू शकतो. कर्णधार पदासाठी तो एक चांगला उमेदवार आहे. टी-20 संघाचे कर्णधार पद हार्दिक पांड्याकडेच कायम असू शकते. तर भविष्यामध्ये श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

महत्वाच्या बातम्या