IND vs SL | अर्षदीपच्या नो-बॉलवर गौतम गंभीर संतापला, म्हणाला…

IND vs SL | पुणे: श्रीलंकेविरुद्ध (IND vs SL) सुरू असलेल्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यामध्ये भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजाने खूप खराब प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या श्रीलंका संघाने भारताला 207 धावांचे लक्ष दिले होते. या सामन्यामधील भारतीय संघाच्या पराभवाची अनेक कारणे समोर आली आहे. या सामन्यानंतर माजी खेळाडू गौतम गंभीर (Gautam Gambhir) एका खेळाडूवर संतापला आहे. या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू नये, असे त्याने स्पष्ट मतं व्यक्त केलं आहे.

सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “जर तुम्ही दुखापतीनंतर सामना खेळायला येत असाल, तर तुम्ही येताच आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकत नाही. त्याआधी तुम्ही देशांतर्गत सामने खेळावे. त्यामध्ये फॉर्ममध्ये आल्यानंतर तुम्ही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळायला यावे. कारण नो-बॉल फेकणे हे प्रत्येक गोलंदाजाच्या हातात असते. जे खेळाडू दुखापतीने ग्रस्त आहेत त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळावे आणि आधी तिकडे चांगली कामगिरी करावी.”

पुढे बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “फिल्डरकडून चुका होऊ शकतात. फलंदाज एखादा शॉट खराब खेळू शकतो. त्याचबरोबर गोलंदाज देखील खराब चेंडू टाकू शकतो. मात्र, एकाच सामन्यात एकापेक्षा अधिक नो-बॉल स्वीकारले जाणार नाहीत. यासाठी गोलंदाजी प्रशिक्षक देखील जबाबदार आहे. प्रशिक्षकाने सराव सत्रांमध्ये कणखर असायला हवे.”

प्रदीर्घ काळानंतर अर्षदीपचे अचानक प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन झाले होते. खेळात अनियमितता निर्माण झाल्याने तो एका मागे एक नो-बॉल टाकत गेला. प्रत्येकजण खराब गोलंदाजी करतो किंवा खराब फलंदाजी करतो. पण हे सर्व लयबद्ध आहे. जर तुम्ही दुखापतीनंतर पुनरागम करत असाल, तर लगेच आंतरराष्ट्रीय सामना खेळू नये.” असं देखील गौतम गंभीर यावेळी म्हणाला आहे.

महत्वाच्या बातम्या