Mosquitos | डासांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Mosquitos | टीम महाराष्ट्र देशा: बदलत्या वातावरणामुळे डासांचे प्रमाण वाढत जाते. डास आपल्याला खूप त्रास देतात आणि त्याचबरोबर ते आपल्या आरोग्यासाठी खूप घातक असतात. डासांना पळून लावण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक कॉईलचा वापर करतात. मात्र सतत कॉईलचा वापर करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे घरातील डासांना पळवून लावण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे घरगुती उपाय केल्याने आरोग्याला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही. घरातील डासांना पळवून लावण्यासाठी तुम्ही खालील घरगुती उपाय करू शकतात.

लसूण (Garlic-For Mosquitos)

डासांना घरातून पळून लावण्यासाठी लसूण मदत करू शकतो. यासाठी तुम्हाला दोन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक करून घ्याव्या लागतील. त्यानंतर तुम्हाला हा लसूण एक ग्लास गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावा लागेल. हे पाणी तुम्हाला स्प्रे बॉटलच्या मदतीने घरामध्ये शिंपडावे लागेल. लसणाच्या वासामुळे घरातील डास पळून जातील.

सोयाबीन तेल (Soybean oil-For Mosquitos)

सोयाबीन तेल डासांना पळून लावण्यासाठी मदत करू शकते. यासाठी तुम्हाला कॉटन बॉलला सोयाबीन तेल लावून घ्यावे लागेल. त्यानंतर हे कॉटन बॉल तुम्हाला घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ठेवावे लागेल. सोयाबीनच्या वासाने घरामध्ये डास प्रवेश करणार नाही. त्यामुळे घरातील डासांना दूर करण्यासाठी सोयाबीन तेल उत्तम पर्याय ठरू शकते.

पुदिन्याची तेल (Peppermint oil-For Mosquitos)

पुदिन्याचा वास डासांना असह्य होतो. त्यामुळे घरातील डास पळून लावण्यासाठी तुम्ही संपूर्ण घरामध्ये पुदिन्याचे तेल शिंपडू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही घराच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये पुदिन्याची पाने साठवून ठेवू शकतात. पुदिन्याच्या पानामुळे देखील घरामध्ये डास प्रवेश करणार नाही.

घरातील डास दूर करण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर लवंगाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेच्या खालील समस्या सहज दूर होऊ शकतात.

एक्ने दूर होतात (Acne goes away-Clove Water Benefits)

चेहऱ्यावरील एक्नेची समस्या दूर करण्यासाठी लवंगाचे पाणी उपयुक्त ठरू शकते. यामध्ये आढळणारे अँटिस्पेक्टिक आणि अँटिबॅक्टरियल गुणधर्म चेहरा स्वच्छ करतात आणि चेहऱ्याला संसर्गपासून दूर ठेवतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी आणि चेहरा चमकदार बनवण्यासाठी लवंगाचे पाणी फायदेशीर ठरू शकते.

चेहऱ्याची चमक वाढते (The glow of the face increases-Clove Water Benefits)

नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी लवंगाच्या पाण्याचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. लवंगाच्या पाण्यामध्ये आढळणारे गुणधर्म त्वचेचा रंग साफ करण्यास मदत करतात. नियमित लवंगाच्या पाण्याने चेहरा स्वच्छ केल्याने चेहऱ्याचा रंग सुधारू शकतो.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या