Ordnance Factory | टीम महाराष्ट्र देशा: रोजगाराची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ऑर्डनन्स फॅक्टरी नोकरीची संधी (Job opportunity) उपलब्ध करून देत आहे. चंद्रपूर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेले पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ऑर्डनन्स फॅक्टरी (Ordnance Factory) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये विविध पदांच्या एकूण 76 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 06 जागा, पदवीधर अप्रेंटिस (जनरल) 40 जागा, टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 30 जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Ordnance Factory) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Ordnance Factory) इच्छुक उमेदवारांना दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता
महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी चांदा, चंद्रपूर (महाराष्ट्र)-254043.
जाहिरात पाहा (View Ad)
https://drive.google.com/file/d/19SoKIOy8A5jtX09IRy2vgzs1uzgU6I4U/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Ginger Oil | केसांना आल्याचे तेल लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Eknath Shinde | शरद पवारांच्या अदानी प्रकरणावरील वक्तव्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- Job Opportunity | 10 पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
- Weight Loss | वजन कमी करण्यासाठी काकडीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध