Raj Thackeray | “आज याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर झिम्मा”; राज ठाकरेंचा मिश्किल टोला

Raj Thackeray | मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या वक्तव्याने नेहमीच चर्चेत असतात. लोकांमध्ये त्यांच्या वक्तृत्वशैलीची मोठी चर्चा होताना दिसून येते. त्यामुळे राज ठाकरेंचं भाषण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आज मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंची पनवेलमध्ये जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्येही त्यांनी अशाच प्रकारे मिश्किलपणे काही वक्तव्य करत विरोधकांवर मिश्किल टीका केली आहे.

“आज याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर झिम्मा”

“आत्ताची सध्याची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहाता मतदारांना काही किंमत आहे असं मला काही वाटतच नाही. तुम्ही फक्त यांचे नोकर आहात. मतदान करा आणि मोकळे व्हा. बाकी आम्ही आमचं काय नाचायचं ते नाचू. आज याच्याबरोबर फुगडी तर त्याच्याबरोबर झिम्मा”, असं राज ठाकरे म्हणाले. या मुलाखतीमध्ये त्यांनी राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडणं टाळलं असलं, तरी सध्याच्या राजकीय स्थितीवर गुढी पाडव्याच्या दिवशी सविस्तर बोलेन, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Raj Thackeray criticize trollers 

मुलाखतकारांनी “राज ठाकरेंनी थोडं वाचन वाढवावं” अशी टीका करणाऱ्या टीकाकारांविषयी काय वाटतं, असा प्रश्न त्यावर त्यांनी मिश्किलपणे टोला लगावला. “हा त्यांच्या अज्ञानाचा भाग असतो. मला काही फरक पडत नाही या गोष्टींचा. पण मी जेव्हा त्यानंतर चार दुऱ्ऱ्या टाकतो, तेव्हा ते पॅक होतात. त्यापुढे त्यांना बोलता येत नाही”, असं राज ठाकरे आपल्या खास शैलीत म्हणाले आहेत.

“मी सामना-मार्मिक वाचत नाही. माझ्याकडे हे दोन्ही येतात, पण मी वाचत नाही. हल्ली वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या फार नसतात. चॅनल्स तर बघवतच नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-