Sanjay Raut | समृद्धी महामार्ग शापित मार्ग झाला – संजय राऊत

Sanjay Raut | मुंबई: नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्स बसचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 25 पेक्षा जास्त प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे. समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

The government has taken arbitrary measures to make the Samriddhi Highway – Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, गेल्या वर्षभरामध्ये अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. समृद्धी महामार्गावर झालेला अपघात दुर्दैवी आहे. समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला? याच्या खोलात जावं लागणार आहे. समृद्धी महामार्ग बनवण्यासाठी सरकारनं मनमानी केली आहे. भविष्यात या सर्व गोष्टी बाहेर येतील. दुर्दैवानं त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहे. समृद्धी महामार्गाच्या वेगमर्यादे संदर्भात आम्ही अनेकदा मागणी केली आहे. मात्र, त्या संदर्भात काही होत नाही.

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “भ्रष्टाचारातून निर्माण झालेला तो रस्ता आहे, असं मला सारखं वाटतं. अनेकांच्या जमिनी या रस्त्यासाठी हडप करण्यात आल्या आहेत. त्या रस्त्याला अनेकांचे शाप लागले आहेत. म्हणून हे अपघात होत आहे, असं मला वाटतं.”

आज मुंबईत ठाकरे गट आणि शिंदे गट दोन्हीकडून मोर्चे काढण्यात येणार आहे. यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हा मोर्चा म्हणजे भारतीय जनता पक्षाची नौटंकी आहे. हिम्मत असेल तर त्यांनी निवडणुका घेऊन दाखवावं. म्हणजे शोर कोण माजवत आहे आणि चोर कोण आहे?, हे कळेल.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3PF1IHB