Shubhangi Patil | “मी लगेच आझाद मैदानावर…”; निकाल लागण्याआधीच शुभांगी पाटलांनी दिला आंदोलनाचा इशारा

Shubhangi Patil | नाशिक : शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहेत. नाशिकमधील उमेदवार निवडीवरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी यावरून बंडखोरी करत थेट अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सत्यजीत तांबे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेट लढत होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शुभांगी पाटील निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी आंदोलन करणार आहेत.

“अनेक प्रश्न मोठ्या काळापासून प्रलंबित आहेत. त्यामुळे एक एक दिवस वाया जाणं मला योग्य वाटत नाही. पदवीधर अनेक प्रश्नांनी ग्रासलेला आहे. ते प्रश्न सोडवण्यासाठी एक एक दिवस महत्त्वाचा आहे. मी आज आंदोलन करत नाहीये. मी गेल्या चार वर्षांपासून पदवीधरांच्या प्रश्नावर काम करत आहे. तेव्हापासून मी सांगितलं होतं की, जेव्हा मी विजयी होईल तेव्हा मी विजयाची रॅली काढणार नाही, तर आंदोलनाची रॅली काढेन. हे मी आधीपासून सांगत होते, कारण प्रश्न फारच जटील आहेत. जनतेने त्यासाठीच निवडून दिलेलं असतं. निकाल लागला की, मी लगेच आझाद मैदानावर आंदोलनासाठी जाणार आहे,” असे शुभांगी पाटील यांनी सांगितले आहे.

“मला किती मतदान झालं हे मला पाठ आहे. कारण मी गेल्या 10 वर्षांपासून याच जनतेत फिरत आहे. त्यामुळे मला किती मतदान होईल याचा मतदारही माझा पाठ होता. कोणी काहीही सांगितलं तरी ते मतदान मला झालं आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये चौथ्याच्या मुलाने मतदान केलं की, कोणी केलं हे मला माहिती नाही. पदवीधर मतदार माझा पाठ आहे. म्हणून विजय माझाच होणार आहे”, असे शुभांगी म्हणाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या