IND vs AUS | टीम इंडियासाठी खुशखबर! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये रवींद्र जडेजा करणार पुनरागमन

IND vs AUS | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 9 फेब्रुवारीपासून नागपूर येथे कसोटी सामने खेळले जाणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाला आनंदाची बातमी मिळाली आहे. टीम इंडियातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त होत आहे. त्याची भारतीय कसोटी संघात निवड होणार असल्याची माहिती मिळाली आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर पडला आहे. तर तो दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये रवींद्र जडेजाने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आशिया करंडकादरम्यान जडेजाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला टी-20 विश्वचषकामधून बाहेर पडावे लागले होते. तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी त्याचे टीम इंडियामध्ये पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी श्रेयस अय्यर तंदुरुस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. श्रेयस सध्या बंगलोरमध्ये राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीमध्ये उपचार घेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अनेक इंजेक्शन घेतल्यानंतरही श्रेयसला पाठीच्या दुखापतीतून आराम मिळत नाहीये. त्यामुळे त्याला किमान दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, के. एस. भारत (यष्टिरक्षक), इशान किशन (यष्टिरक्षक), रवीचंद्रन अश्‍विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव या खेळाडूंचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या