COVID-19 | देशांमध्ये 6 दिवसानंतर आढळले ‘एवढे’ कोरोना रुग्ण

COVID-19 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्ण (Corona patient) संख्येत वाढ होताना दिसत होती. गेल्या आठवड्यामध्ये दररोज दहा हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्येची नोंद करण्यात आली. अशा परिस्थितीत तब्बल सहा दिवसानंतर कोरोना रुग्ण संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. देशामध्ये गेल्या 24 तासांत 6 हजार 904 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. देशामध्ये सध्या सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा 65 हजार 683 वर पोहोचला आहे. तर गेल्या 24 तासांत 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शनिवारी (22 एप्रिल) देशामध्ये 10 हजार 112 नवीन कोरोना (COVID-19) रुग्ण आढळले, तसेच 29 जणांचा या संसर्गामुळे मृत्यू झाला.  या दरम्यान 9 हजार 833 लोक बरे झाले आहे. यापूर्वी 17 एप्रिल रोजी दहा हजारांपेक्षा कमी रुग्ण संख्या नोंदवण्यात आली होती.

एप्रिलच्या 22 दिवसांमध्ये देशात 1.69 लाख नवीन कोरोना  (COVID-19) रुग्ण आढळले आहे. तर मार्च महिन्याच्या 31 दिवसांमध्ये 31,903 रुग्णसंख्या नोंदवली गेली होती. मार्च महिन्याच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये 5.3 पट अधिक रुग्णसंख्या आढळून आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

देशामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना (COVID-19) रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून सातत्याने केले जात आहे. त्याचबरोबर नियमित मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

महत्वाच्या बातम्या