Devendra Fadnavis | ही ‘मोदी हटाव’ नव्हे ‘परिवार बचाव’ बैठक आहे; विरोधकांच्या बैठकीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटणा शहरात विरोधी पक्षाच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीला देशासह राज्यातील अनेक विरोधी पक्षातील नेते उपस्थित आहे. शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), प्रफुल्ल पटेल (Praful Patel), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray) इत्यादी नेते या बैठकीला हजर आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

This meeting of the opposition is a ‘Parivar Bachao ‘ meeting – Devendra Fadnavis 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “विरोधकांनी या बैठकीला ‘मोदी हटाव’ असं नाव दिलं आहे. मात्र, ही बैठक ‘मोदी हटाव’ नाही तर ‘परिवार बचाव’ बैठक आहे. देशातील सगळे परिवारवादी पक्ष आज एकत्र आले आहे. आपल्या परिवाराकडे कशाप्रकारे सत्ता येईल? यासाठी ही लोकं एकत्र आली आहे.”

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “विरोधकांसाठी राज्य चालवणं फक्त एक धंदा आहे. विरोधकांनी आधी देखील एकत्र येऊन पाहिलं आहे. मात्र, देशाची जनता मोदीजींच्या सोबत आहे. विरोधकांनी कितीही मिळावे आणि बैठकी घेतल्या तरी देशातील जनता मोदींसोबतच राहणार.”

यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना देखील सुनावलं आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “उद्धव ठाकरे मेहबूबा मुक्तीच्या नावानं सतत भाजपवर टीका करत असतात. मात्र, आज ते स्वतः महबूबा मुक्तीसोबत जाऊन बसले आहे.”

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Pp0foz