Radhakrushna Vikhe Patil | राधाकृष्ण विखे पाटलांची अशोक चव्हाणांना खुली ऑफर; लवकरच भाजपमध्ये जाणार?

Radhakrushna Vikhe Patil | मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यापासून अनेक नेत्यांनी पक्षांतर केल्याचे पहायला मिळाले. काँग्रेसमधून अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच काँग्रेस पक्षातील अंतर्गत वादही अनेकदा चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपत जाण्याबाबत अनेक चर्चा रंगायला लागल्या आहेत. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची खुली ऑफर दिली आहे.

राधाकृष्ण विखे पाटलांची खुली ऑफर

‘अशोक चव्हाण हे एक सक्षम नेते आहेत. काँग्रेस पक्षाचं भविष्य अंधारमय आहे, त्यामुळे अशोकराव चव्हाण यांनी भाजपत प्रवेश करण्याचा विचार करावा’, अशी खुली ऑफर विखे-पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. या ऑफरनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Radhakrishna Vikhe Patil Offer to Ashok Chavan

“अशोक चव्हाण सध्या ज्या पक्षात आहेत. त्या काँग्रेस पक्षाचं भविष्य काय आहे? नाशिक पदवीधर मतदारसंघात व्यक्तिगत अजेंड्यावर निवडणूक जिंकली. तिथे पक्षाचा कुठेही विचार झाला नाही. पक्षाचा विचार करण्यासाठी काँग्रेसमध्ये कुणालाही वेळ नाही”, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

“अशोक चव्हाणांनी विचार करावा”

“मला वाटतं की अशोक चव्हाण हे एक सक्षम नेते आहेत. त्यांनी मुख्यमंत्री पदावर काम केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व संपूर्ण जगाने स्वीकारलं आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायला सर्वांनाच आवडेल. अशोकराव चव्हाणांनीही याबाबत विचार केला पाहिजे”, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-