Sanjay Raut | राऊतांना ‘जोर का झटका’; विधानसभा अध्यक्षांकडून 15 सदस्यीय समितीची निवड आज

Sanjay Raut | मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, आज संजय राऊतांच्या वक्तव्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभा सभागृहाचा आजचा दिवस हा संजय राऊतांच्या वक्तव्याने चांगलाच गाजला आहे. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’, असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे.

हक्कभंग समिती नेमली जाणार

संजय राऊतांच्या वक्तव्यावरुन राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या याचं वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यासाठी विधिमंडळात जलद गतीने घडामोडी घडत असल्याचं दिसून येत आहे. विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती नेमली जाणार आहे. अध्यक्षांकडून 15 सदस्यीय समितीची निवड आजच होणार आहे. या समितीत सत्ताधारी पक्षाचे 10, तर विरोधी पक्षाचे 5 सदस्य असणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवडीची दाट शक्यता

हक्कभंग समितीचे अध्यक्षपद भाजपच्या वाट्याला जाणार आहे. यासाठी भाजप आमदार राहुल कुल यांच्या निवडीची दाट शक्यता असल्याचं बोललं जात आहे. समितीकडून संजय राऊतांना उद्याच ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याची शक्यता आहे. त्यानंतर संजय राऊत यांना पुढच्या 48 तासांच उत्तर द्यावे लागेल, अशी माहिती मिळत आहे.

काय होतं संजय राऊतांचं वक्तव्य?

संजय राऊत हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी ‘विधिमंडळ नाही, चोरमंडळ’ असा शब्द प्रयोग केला आहे. “ही बनावट शिवसेना आहे. ड्युप्लिकेट. चोरांचं मंडळ. चोर मंडळ. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत. अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो”, असं संजय राऊत म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-