Sanjay Raut | “शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का भो***?”; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली जात असतानाच राऊतांचं पुन्हा एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. संजय राऊत आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान एका सभेत बोलताना संजय राऊत यांची जीभ पुन्हा घसरली आहे. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर अतिशय खालच्या शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

“शिवसेना तुझ्या बापाची आहे का भो***?”

“संघर्ष करणं हा शिवसैनिक आहे. उपाशी राहुन घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री केलं आहे. शिवसैनिक इथेच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते 50 खोके घेऊन पळून गेले आहेत. आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे, तुझ्या बापाची आहे का भो***? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का?”, असं संजय राऊत सांगलीच्या कार्यक्रमात म्हणाले आहेत.

Sanjay Raut Criticize on Shinde Group

“खूप वर्षांनी मी सांगलीत आलो आहे. सांगलीत प्रवेश केल्यापासून रस्त्या-रस्त्यावर शिवसैनिकांनी स्वागत केलं. यामध्ये सर्वात जास्त मुस्लिम बांधव होते. शिवसैनिकांनी गर्जना करत स्वागत केले. सांगलीचे आमदार-खासदार निवडून आले हे परत निवडून येणार का? 50 खोक्यांच्या एवढ्या घोषणा झाल्या की जगात कुठली गोष्ट लोकप्रिय झाली नाही आणि वाऱ्यासारखी पसरली नाही. पण आतापर्यंत आम्ही बघितलं, हे वारे झाले ते वारे झाले. पण ‘50 खोके एकदम ओके’ हे अख्ख्या जगात पोहचलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“सगळ्या भाजपला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही”

“मुख्यमंत्र्यांविषयी बोलणं योग्य नाही. सन्मान राखला पाहिजे. पण जर जनतेच्या भावना असतील तर मी काही बोलणार नाही. ज्यांनी शिवसेने सोडली त्यांना आणि सगळ्या भाजपला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. शिंदे आणि चाळीस चोरांनी, दिल्लीच्या रंगा बिल्लांनी काय समजलं? निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे यांच्या घशात घातली. त्यानंतर राज्यात वणवा पेटला आहे”, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

“शिवसेनेची ताकद कोणाच्या दावणीला लागणार नाही”

“शिवसेनेची ताकद कोणाच्या दावणीला लागणार नाही. प्रत्येक जण म्हणतोय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत महाविकास आघाडीचे राज्य आणायचं आहे. महाविकास आघाडीचं राज्य आणायचं आहे. त्यासाठी सांगलीचा वाटा पहिजे. काही घटकेचे सरकार आहे. आधी 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. हिमतीचा सागर तो कसा आटणार?”, असा सवाल यावेळी बोलताना संजय राऊत यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-