Shahajibapu Patil । “मी पण शरद पवारांच्याचं तालमीत तयार झालोय” : शहाजी बापू पाटील

Shahajibapu Patil । सांगोला : शिंदे गटाचे नेते आणि आमदार शहाजीबापू पाटील ( Shahajibapu Patil ) हे काय झाडी, काय डोंगर ,काय हाटेल या डायलॉगमुळे संपूर्ण देशभरात चर्चेत आहेत. तसचं ते ठाकरे गटावर देखील टीका करताना पाहायला मिळतात. याचप्रमाणे राज्यात सध्या सर्व पक्षातील आमदार, खासदार आणि नेत्यांकडून देखील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. तसचं काही नेत्यांनी तर अचानकपणे काही गौप्यस्फोट केल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. तर शहाजीबापू पाटील हे सांगोल्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर दावा केला आहे.

शहाजीबापू पाटीलांचे अनेक खुलासे (Many revelations of Shahjibapu Patil )

तर शहाजीबापू पाटील हे सांगोल्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी “आमदार-खासदार आपल्या दारी” या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे की, माझ्यासह ४० आमदारांचे उद्धव ठाकरे यांच्यामार्फत शरद पवार हे तिकीट कापणार होते, असा आरोप आणि दावा देखील आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला आहे. याचप्रमाणे त्यांनी अनेक खुलासे देखील केले आहेत. पुढे पाटील म्हणाले “पवार साहेब हे या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. माझ्यासाठी ते गेली ४५ वर्षे हे राजकारणातील पालक होते. पण पवार साहेबांच्या राजकारणाचा इतिहासाचा जर का बारकाव्याने अभ्यास केला तर त्यांच्याजवळ जे गेले त्या पक्षांना पवारांनी संपवून टाकलं आहे”. असं देखील शहाजीबापू पाटील म्हणाले. तसंच अजित दादा, जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि पवार साहेब यांचा प्लॅन सुरू होता की, आगाम निवडणुकांमध्ये शिवसेनेला १०-१५ जागांच्या वर जाऊ द्यायचे नाही. यासाठी सर्वसाधारण ४० लोकांची यादी त्यांच्याकडे होती, ज्यांचे तिकीट कापण्यात येणार होते. त्यात माझे देखील नाव होते. असा खुलासा शहाजीबापू पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोना आणि वेगवेगळ्या आजारांचे कारण देत त्यावेळी उद्धव ठाकरे हे मंत्रालयात येत नव्हते. हा धोका टाळून शिवसेना वाढली पाहिजे, या विचाराने आमचे खंबीर नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्वांनी नेतृत्व दिलं आणि आम्ही राष्ट्रवादीचा हा डाव हाणून पाडला. मी सुद्धा शरद पवारांच्या तालमीत तयार झालेलो आहे. असं यावेळी शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या-