Skin Care Tips | चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा बेसनाचा वापर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: त्वचा (Skin) निरोगी (Healthy) आणि चमकदार (Glowing) ठेवण्यासाठी आपण अनेक पर्याय अवलंब होत असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक अनेक प्रकारची महागडी उत्पादने वापरतात. पण या महागड्या उत्पादनामुळे त्वचेला फारसा फायदा होत नाही. मात्र या महागड्या उत्पादनामुळे अनेकांना त्वचेच्या समस्या निर्माण होतात. कारण या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात रसायनाचा वापर केला जातो. हि रसायने आपल्या त्वचेला हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी नेहमी नैसर्गिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करू शकतात. बेसन आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतात. चेहऱ्यावरील समस्या दूर करायच्या असतील, तर बेसनाचा पुढील पद्धतीने वापर करा.

चेहऱ्याची (Skin) काळजी घेण्यासाठी पुढील  पद्धतीने करा बेसनाचा वापर

बेसन स्क्रब

चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही नियमित बेसन स्क्रब करू शकतात. यासाठी तुम्हाला एका भांड्यामध्ये दोन चमचे बेसन घेऊन त्यामध्ये दोन चमचे दूध आणि एक चमचा ओट्स मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून झाल्यानंतर त्याला दहा मिनिटे तसेच ठेवून द्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ही पेस्ट चेहऱ्यावर लावून वर्तुळाकार पद्धतीने मसाज करावी लागेल. पाच ते दहा मिनिटे मसाज केल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा साध्या पाण्याने धुवावा लागेल. नियमित या पद्धतीचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होतील.

बेसन फेस पॅक

बेसन फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला दोन चमचे बेसन घ्यावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन ते तीन थेंब गुलाब जल मिसळून घ्यावे लागेल. या मिश्रणामध्ये तुम्हाला एक चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा लागेल. हे सर्व साहित्य नीट मिसळून झाल्यावर त्याची गुळगुळीत पेस्ट बनवून घ्या. तयार झालेला हा फेस पॅक तुम्हाला किमान 20 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. वीस मिनिटानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या फेस पॅकचा वापर केल्याने चेहऱ्यावरील मुरुमांची समस्या कमी होते.

बेसन क्लींजर

चेहऱ्यावरील समस्यांवर मात करण्यासाठी बेसन क्लींजर उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला कच्चे दूध आणि बेसन मिसळून घ्यावे लागेल. हे मिश्रण चेहऱ्यावर लावण्यापूर्वी तुम्हाला तुमचा चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा लागेल. त्यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावून तुम्हाला किमान पाच मिनिटे चेहऱ्यावर मसाज करावी लागेल. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही या पद्धतीचा वापर करू शकतात. नियमित बेसन क्लिंजर वापरल्याने चेहऱ्यावरील घाण आणि अतिरिक्त तेल निघून जाईल.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या