Weather Update । पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

Weather Update | पुणे : अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाला (Rain) अखेर सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये (Farmer) देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यातील बऱ्याच ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग देखील सुरु झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) पुण्यासह इतर जिल्ह्यांना इशारा दिला आहे. आज हवामान खात्याकडून पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Heavy rain will fall in Pune today

आज पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील रत्नागिरी (Ratnagiri), पालघर (Palghar), सिंधुदूर्ग (Sindhudurg) या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना देखील हवामान विभागाने ( Weather Update ) यलो अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार पाऊस होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना पावसाचा अंदाज घेऊन घराबाहेर पडावे असे आव्हान करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली असली तरी काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3XyLKRb