Eknath Shinde | इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वीकारलं

Eknath Shinde | रायगड: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळली (Irshalwadi Landslide) आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही या ठिकाणी बचावकार्य आणि शोधकार्य सुरू आहे.

मात्र, सर्वत्र झालेला चिखल आणि पावसामुळे शोधकार्यात अनेक अडचणी निर्माण होत आहे. बचावकार्यात आतापर्यंत 98 लोकांना वाचवण्यात यश मिळाले आहे.

Eknath Shinde has accepted the guardianship of the accident children

इर्शाळवाडीत झालेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक नेते या ठिकाणी दाखल झाले. या ठिकाणच्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करून त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

त्याचबरोबर दुर्घटनाग्रस्त मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलं आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वतीने डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वाडीत जाऊन तेथील मुलांचं पालकत्व स्वीकारलं आहे.

दरम्यान, आज (22 जुलै) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा वाढदिवस साजरा केला जातो. मात्र, इर्शाळवाडी येथे घडलेल्या दुर्घटनेमुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.

वाढदिवसानिमित्त केला जाणारा खर्च इर्शाळवाडीच्या पुनर्भरणीसाठी आणि ग्रामस्थांच्या मदतीसाठी (Eknath Shinde) उपयोगात आणावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा केला जाणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, अन्नदान वाटप शिबीर आदी कार्यक्रम आयोजित केले जाणार (Eknath Shinde) असल्याचंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3Kb1Yul