INC | “आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार”; काँग्रेस प्रदेशाध्यांकडून स्पष्ट भूमिका

INC | पुणे : राज्याच्या राजकारणात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ आणि पोटनिवडणुकांचे वारे वाहू लागेल आहेत. त्यामुळे प्रचंड वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. पुण्यातील कसबा, चिंचवडची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपने विरोधकांना आवाहन केले आणि खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पुढाकार घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर फोनवरून विनंती केली आहे.

मात्र तरीही महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर करुन निवडणुकीची तयारी केली आहे. आणि आता काँग्रेसने आपली भूमिका मांडली आहे. ‘काँग्रेसकडून पोटनिवडणुकीची सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता 7 तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची तारखी आम्ही उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहोत’, असे स्पष्ट मत नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. नाना पटोले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता का असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की, “मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता’ असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले आहे.

“आता राजकीय परंपरा आणि संस्कृतीची चर्चा भाजप करतंय”

“टिळक परिवारात उमेदवारी मिळाली नाही याबद्दल त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो काँग्रेसला प्रस्ताव दिला आहे त्याला अर्थ राहिला नाही. भाजपला ज्यावेळी त्यांची गरज होती तेव्हा मतदानासाठी स्ट्रेचरवर बसवून आणलं होते, मात्र आता राजकीय परंपरा आणि संस्कृतीची चर्चा भाजप करत आहे”, असे नाना पटोले म्हणाले आहेत.

“राजकीय परंपरेची आणि संस्कृतीची चर्चा करायची नाही” (Political tradition and culture not to be discussed”

भाजप कोणत्याही मुद्यावर ठोस भूमिका घेत नाही म्हणून आता काँग्रेसच्यावतीने रस्त्यावरची लढाई लढण्याचा विचार करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रच्या राजकीय परंपरेची आणि संस्कृतीची जरी चर्चा केली असली तरी ती आता मला करायची नाही” असंही नाना पटोले यांनी यावेळी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-