IND vs NZ | “पाकिस्तानने भारताकडून ही गोष्ट…” ; टीम इंडियाच्या विजयानंतर रमीझ राजा यांचं वक्तव्य

IND vs NZ | टीम महाराष्ट्र देशा: सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. यामध्ये भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडचा 8 गडी राखून परभाव केला. टीम इंडियाने हा सामना जिंकून या एकदिवसीय मालिकेमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर पीसीबीचे माजी अध्यक्ष रमीझ राजा (Rameez Raja) यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

भारतीय संघाने 2019 च्या विश्वचषकानंतर घरच्या मैदानावर 19 एकदिवसीय मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी टीम इंडियाने 15  मालिका आपल्या नावावर केल्या आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, आणि श्रीलंका या संघासोबत घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका जिंकल्या आहे. टीम इंडियाच्या घरच्या मैदानावर मालिका जिंकण्याच्या शैलीवर रमीझ राजा प्रभावीत झाले आहे. यासाठी त्यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे.

रमीझ राजा त्यांच्या यूट्यूब चॅनलवर भारतीय संघाचे कौतुक करताना म्हणाले, “भारतीय संघाला भारतात हरवणे अत्यंत कठीण आहे. पाकिस्तानने भारताकडून ही गोष्ट शिकायला हवी. त्याचबरोबर उपखंडातील इतर संघासाठी देखील ही शिकण्यासारखी बाब आहे. पाकिस्तान संघ पूर्णपणे सुसज्ज आहे. मात्र, पाकिस्तानी संघ घरच्या मैदानावर सातत्याने टीम इंडियासारखी मालिका जिंकू शकत नाही. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा भारतामध्ये होणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

दरम्यान, पाकिस्तानला अलीकडेच न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये 1-2 ने पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे भारतीय संघाने सलग दोन एकदिवसीय मालिका जिंकून वर्षाची शानदार सुरुवात केली आहे. अशात रमीझ राजा यांनी भारतीय संघाचे कौतुक करत पाकिस्तान संघाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या