InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Tag

india

विराट कोहली म्हणतो, ‘या’ लोकांसाठी विश्वचषक जिंकायचा आहे

शहीद जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आम्हाला विश्वचषक जिंकायचा आहे, अशी भावना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केली आहे. काल भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेसाठी इंग्लडला रवाना झाली. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विराटने ही भावना व्यक्त केली.विराट म्हणाला की, “तुम्हाला अनेक गोष्टींपासून प्रेरणा मिळते. जवानांपासून मिळणारी प्रेरणा ही सर्वात महत्वाची असते. जवान सीमेवर देशाचे रक्षण करतात. त्यामळे त्यांच्यापेक्षा मोठं प्रेरणास्थान इतर कोणतं असूच शकत नाही . जेव्हा भारतीय…
Read More...

विंग कमांडर अभिनंदन यांचा पाकिस्तानात आयएसआयने केला होता 40 तास छळ

एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी भारत आणि पाकिस्तानच्या लढाऊ विमानांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीदरम्यान विमान दुर्घटनाग्रस्त होऊन पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन यांनी काही काळाने सुटका झाली. मात्र पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन यांचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत उतरल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन हे सुरुवातीला पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात होते. त्यानंतर त्यांनी आयएसआय या कुख्यात गुप्तहेर संघटनेकडे सोपवण्यात आले होते.…
Read More...

भारतीय लष्कराचा गणवेश बदलणार; मागवल्या सूचना!

भारतीय सैन्यदलातील अधिकारी व जवानांच्या गणवेशात लवकरच काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार आहे. यासंदर्भात भारतीय लष्कराच्या मुख्यालयातून सर्व जवानांना आणि अधिकाऱ्यांना  सूचना देण्यास सांगितले आहे.भारतीय लष्कराच्या जवानांचा पोशाष अधिक स्मार्ट आणि आरामदायी करण्यात येणार आहे.सीमेवर संरक्षण करत असताना अनेकदा हवामानात बदल होतात. यामुळे जवानांना युद्धावेळी कठीण परिस्थितीचा सामना करावा लागतो. त्यामुळे बदलत्या हवामानाला अनुसरुन सैन्याचा गणवेश तयार करण्यात यावा, असे प्रयत्न सुरु आहेत.भारतीय…
Read More...

राजा कायम असेल, पण डळमळीत राहील; भेंडवळच्या भविष्यवाणीचे राजकीय भाकीत

राजा कायम असेल, पण डळमळीत राहील अशी शक्यता घटमांडणीवर करण्यात आली. यावेळी चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी ही भविष्यवाणी केली. दरवर्षी प्रमाणे यंदाही अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी करण्यात आली.“यावर्षी पाऊस सर्वसामान्य असेल. चाऱ्याची टंचाई निर्माण होईल. त्याचबरोबर देशासमोर आर्थिक चणचण जाणवेल.” संरक्षण क्षेत्रावर भविष्यवाणी करताना घुसखोरी कायम राहील, मात्र संरक्षण खाते चोख प्रत्युत्तर देईल, असेही भविष्यवाणीत सांगण्यात आले…
Read More...

शाहिद आफ्रिदीने सर्वात जलद शतक ठोकण्यासाठी वापरलेली बॅट, भारताच्या ‘या’ महान खेळाडूची

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीच्या गेम चेंजर या आत्मचरित्रातून बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी समोर येत आहेत. याआधी गौतम गंभीर हा अंहकारी खेळाडू असल्याचे आत्मचरित्रात म्हटले असल्याचे समोर आले होते. आता शाहिद आफ्रिदीने 37 चेंडूमध्ये ठोकलेल्या सर्वात जलद शतकासंबंधी माहिती समोर आली आहे.लंकेविरुद्ध आफ्रिदीनं 37 चेंडूंत आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम केला होता. हे शतक ठोकताना आफ्रिदीने वापरलेली ती बॅट त्याची नव्हतीच, हे शतक आफ्रिदीने भारताचा महान फलंदाज सचिन…
Read More...

मसूद अजहरवरील कारवाईचा निवडणुकीशी काही संबंध आहे का हे मला माहित नाही – कमलनाथ

जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीकडून आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी मसूद अजहरवर करण्यात आलेली कारवाई लोकसभा निवडणुकीच्या काळात करण्यात आली असल्याचे म्हणत संशय व्यक्त केला आहे.मसूद अजहरवर कारवाई नेमकी निवडणुकांच्या काळातच झाली, सूद अजहरवर ही कारवाई यापूर्वीच झाली असती तर चांगलं झालं असतं, आता खुप उशिर झालाय. हे नेमकं निवडणुकीच्या काळातच घडतंय, याचा निवडणुकीशी काही संबंध आहे का हे मला माहित नाही, अशी…
Read More...

लोकशाहीची गळचेपी होते म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे – विक्रम गोखले

लोकशाहीची गळचेपी होते आहे असं म्हणणाऱ्यांचं थोबाड फोडलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अभिनेते विक्रम गोखले यांनी दिली आहे. मुंबईतील विले पार्ले या ठिकाणी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.देशाची लोकशाही धोक्यात आहे, त्यावर तुमचं मत काय ? असे विचारले असता विक्रम गोखले म्हणाले की, कोण असं म्हणतं त्यांना समोर आणा! मी आत्ता माझं मत मांडतो आहे, इथे प्रत्येकजण मत मांडू शकतो, यांना मतदान करा किंवा करू नका हे सांगू शकतो अशावेळी गळचेपी होते…
Read More...

“काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे, तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा”

काश्मीर मुद्दावरून वारंवार वादग्रस्त विधान करणारा पाकिस्तान क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने पुन्हा एकाद काश्मीर मुद्दावर आपले मत मांडले आहे. त्याच्या 'गेंम चेंजर' या आत्मचरित्रात काश्मीर ना भारताचा, ना पाकिस्तानचा असा दावा केला आहे.शाहिद आफ्रिदीने आपल्या आत्मचरित्रात लिहिले आहे की, ''काश्मीर हा काश्मीरी जनतेचा आहे. तो ना भारताचा आहे, ना पाकिस्तानचा.''https://twitter.com/Hstudio18/status/1123092435897409536शाहिद आफ्रिदेने अनेक वेळा काश्मीर प्रश्नावर आपले मत मांडत पाकिस्तान सरकारलाच घरचा आहेर…
Read More...

हिममानवाच्या पावलांचे ठसे आढळले, भारतीय सैन्याकडून फोटो प्रसिद्ध

बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या हिममानवाबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. मात्र पहिल्यांदाच भारतीय सेनेने हिममानव प्रत्यक्षात असल्याची शक्यता अधिकृतपणे वर्तवली आहे. बर्फामध्ये दिसणाऱ्या हिममानवाच्या पाऊलखुणांचे फोटो सैन्याने ट्विटर हँडलवरुन ट्वीट केले आहेत.भारतीय सैन्याने ट्विट केले की, “भारतीय सैन्याच्या टीमने 9 एप्रिल 2019 रोजी पहिल्यांदाच मकालू बेस कॅम्पजवळ 32×15 इंचाचे हिममानव ‘येती’च्या पायांचे रहस्यमय फोटो पाहिले.”https://twitter.com/adgpi/status/1122911748829270016येती’ हा जगातील सर्वात…
Read More...

आरबीआयने केली घोषणा, 20 रुपयांच्या नव्या नोटा चलनात येणार

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 20 रुपयांच्या नव्या नोटेची घोषणा केली असून, लवकरच नवीन नोटा चलनात येणार आहेत. या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे विद्यमान गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्वाक्षरी असेल.“हिरवा आणि पिवळ्या रंगाचं मिश्रण असलेला रंग 20 रुपयाच्या नव्या नोटेला असेल. नोटेच्या मागील बाजूस एलोराच्या गुहांचे चित्र छापण्यात येईल”, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले. ही नोट 63mmx129mm एवढ्या आकाराची असणार आहे.नोटेच्या पुढील बाजूस काय असेल?देवनागरी लिपीत 20 रुपये लिहिलेले असेल…
Read More...