IND vs SL | टीम इंडियामध्ये ऋषभ पंतची कमी जाणवणार? कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला…

IND vs SL | मुंबई: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यामध्ये आजपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. हार्दिक पांड्या (Hardik Pandya) टी-20 संघाचे कर्णधार पद सांभाळणार आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये त्याला ऋषभ पंतबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर पंतच्या अनुपस्थितीत टीम इंडियावर काय परिणाम होईल? याबाबत हार्दिक पांड्याने पत्रकारांना उत्तर दिलं आहे.

टीम इंडिया मध्ये ऋषभ पंत नसल्यावर काय होईल? असा प्रश्न पत्रकाराने हार्दिक पांड्याला विचारला होता. त्याचे उत्तर देत पांड्या म्हणाला की,”ऋषभ पंतसोबत जे घडलं ते खूप दुर्दैवी होतं. त्यावर कुणाचेही नियंत्रण नव्हतं. त्याला लवकरात लवकर बरं वाटावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आमच्या सर्वांच्या प्रार्थना त्याच्यासोबत आहे. त्याची प्रकृतीसाठी आम्ही सगळेजण प्रार्थना करत आहोत.”

आजपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध टी-20 मालिकेमध्ये ऋषभ पंत खेळू शकणार नाही. याबद्दल पत्रकाराने हार्दिकला प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत हार्दिक म्हणाला की,”पंत नक्कीच टीमचा एक महत्त्वाचा खेळाडू आहे. पण सध्या टीममध्ये त्याची काय स्थिती होती हे सगळ्यांनाच माहित आहे.” ऋषभ पंतच्या जागी ज्या खेळाडूला संघात संधी मिळेल त्या खेळाडूंनी या संधीचे सोनं केलं पाहिजे, असे देखील हार्दिक पांड्या म्हणाला.

आजपासून सुरू होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेमध्ये ऋषभ पंतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते. त्यामुळे तो टीम इंडियाच्या वेळापत्रकातून बाहेर होऊ शकते. त्याच्या दुखापतीचे गांभीर्य पाहता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या 4 कसोटी मालिका आणि एक दिवसीय मालिकेसाठी अनुपस्थित राहणार, असे मानले जात आहे.

महत्वाच्या बातम्या