Rishabh Pant | ऋषभ पंत आयपीएलनंतर वनडे वर्ल्ड कप मधून बाहेर?

Rishabh Pant | मुंबई: भारतीय संघातील क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबर रोजी अपघात झाला होता. अपघातानंतर त्याच्यावर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरू होते. सध्या त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या रुग्णालयातून ऋषभ पंत आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आली आहे. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतला मैदानावर परतण्यासाठी किमान आठ ते नऊ महिने लागू शकतात. याचा अर्थ असा की पंत फक्त आयपीएलमधूनच नाही, तर एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून देखील बाहेर जाऊ शकतो.

मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयामध्ये ऋषभ पंतवर पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पंतची सूज कमी झाल्याशिवाय एमआरआय किंवा शस्त्रक्रिया केल्या जाणार नाही. रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, पंतला लिगामेंट दुखापतीतून सावरण्यासाठी आठ ते नऊ महिने लागतील.

ऋषभ पंतला बुधवारी एअरलिफ्ट करून मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या अहवालानंतर बीसीसीआय आता पंतला पुढील शस्त्रक्रियेसाठी लंडनला नेण्याचा विचार करत आहे. दरम्यान, पंतला पूर्णपणे बरे होण्यासाठी आठ ते नऊ महिने लागू शकतात.

ऑक्टोबर महिन्यामध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा होणार आहे. ऋषभ पंतला दुखापतीतून सावरण्यासाठी आठ ते नऊ महिने लागू शकतात. दरम्यान तो विश्वचषक स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो. त्याचबरोबर तो यावर्षी आयपीएलमधून देखील बाहेर पडला आहे.

महत्वाच्या बातम्या