Sanjay Raut | रावसाहेब दानवेंनी निवडून येऊन दाखवावं; संजय राऊतांचं दानवेंना खुलं आव्हान

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. संजय राऊत यांनी सध्या रावसाहेब दानवेंवर (Raosaheb Danve) निशाणा साधला आहे. भाजप नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावं, असं आवाहन राऊतांनी दानवेंना केलं आहे.

रावसाहेब दानवेंवर निशाणा साधत संजय राऊत म्हणाले, “रावसाहेब दानवे यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं. येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी त्यांचा पराभव करणार आहे. आता लवकरच आम्ही मराठवाडा दौरा करणार आहोत.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, “मराठवाडा महाविकास आघाडीसाठी खूप महत्त्वाचा आहे. नांदेड आणि बीडमध्ये आमच्या सभा होणार आहे. रावसाहेब दानवेंनी पुन्हा लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावं. महाविकास आघाडी त्यांचा पराभव करणार आहे.”

रावसाहेब दानवे काय म्हणाले होते? (What did Raosaheb Danve say?)

माध्यमांशी संवाद साधत असताना रावसाहेब दानवे म्हणाले होते, “महाविकास आघाडीच्या कितीही बैठका आणि दौरे होऊ द्या. मात्र, 2024 मध्ये देशात आणि राज्यात पुन्हा मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन करणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील. त्यानंतर पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? यावरून त्यांच्यात फूट पडेल. हे कुणी एकत्र येत नाही, आणि आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/45dTBY0