Sanjay Raut | शरद पवारांच्या निवृत्तीवर संजय राऊतांचं भाष्य ; म्हणाले…

Sanjay Raut | राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP) सर्वोसर्वा शरद पवार ( Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. तर त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी राजीनामा मागे घ्यावा अशी विनंती केली आहे. तर विरोधी पक्ष नेते अजित पवार ( Ajit pawar) यांनी सांगितलं की पवार साहेब हा निर्णय मागे घेणार नाहीत. तसचं यानंतर यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी शिवेसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा दाखला देत राऊतांनी शरद पवारांची काय मानसिकता असेल हे सांगण्याचा प्रयत्न ट्विटमधून केला. आहे.

संजय राऊतांनी काय ट्विट केलं (What Sanjay Raut tweeted)

खासदार संजय राऊत हे कायमच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. तर त्यांनी आज शरद पवारांनी घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाबाबत ट्विट करत म्हटलं आहे की, “एक वेळ अशी आली…घाणेरडे आरोप…प्रत्यारोप…राजकारण याचा उबग येऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील शिवसेना प्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. शरद पवार यांनी तेच केलं आहे. जनतेच्या रेट्यामुळं बाळासाहेबांना राजीनामा मागे घ्यावा लागला. शरद पवार हे देशाच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे श्वास आहेत” असं ट्विट करत संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, भाकरी फिरवण्याचे संकेत होते परंतु तवाच फिरवला असं देखील राऊत म्हणले. तसचं यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या निर्णयाचे समर्थन केलं आहे. कोणीही अध्यक्ष झाले तरी शरद पवारांच्या जीवावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चालणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. यावेळी अजित पवार यांनी काँग्रेसचं उदाहरण देखील दिल. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आहेत. पण निर्णय सोनिया गांधी घेतात. त्यामुळे शरद पवार पक्षाचे निर्णय घेतील.असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-